सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर
- By - Team Agricola
- Nov 07,2024
सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर
बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारात सरासरी ४८०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार ०७ नोव्हेंबर रोजी सोयाबीनला बाजारात सरासरी दर हा ३०५० ते ४८०० रूपयांपर्यंत भाव मिळाला आहे. अकोला बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी भाव हा ४३०० रूपये मिळाला आहे. लातूर बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी ४१३० रूपये भाव मिळाला आहे. अमरावती बाजारसमितीत ३९७५ रूपये भाव मिळाला आहे.
वाशिम बाजाारसमितीत सोयाबीनला सरासरी भाव हा ४४४० रूपये मिळाला आहे.
बाजारसमितीतील आवक
लातूर- ३४९८४ क्विंटल
अमरावती- १३३३५ क्विेटल
अकोला- ४९९५ क्विंटल
वाशिम- २५०० क्विंटल