new-img

रब्बी हंगामातील पिकांसाठी पीक विमा योजना लागू

रब्बी हंगामातील पिकांसाठी पीक विमा योजना लागू


प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत येणाऱ्या 2024 ते 25 मध्ये एक रुपयात पिक विमा  लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना रब्बी हंगामातील प्रमुख पिके गहू ज्वारी आणि हरबरा या तीन पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी हरभरा, गहू साठी तारीख 15 डिसेंबर तर ज्वारी या पिकासाठी 30 नोव्हेंबर ही तारीख असणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली आहे.

एक रुपया मध्ये पिक विमा भरता येणार असून गहू या पिकासाठी 42500 रुपये पिक विमा संरक्षित रक्कम आहे. तर ज्वारी या पिकासाठी 33750, हरभरा या पिकासाठी 37500 रुपये विमा संरक्षित आहे.