new-img

सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर

सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर

गेल्या दोन वर्षापासून सोयाबीनचे भाव घसरले आहेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारसमितीत हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. सोयाबीनला बाजारात सरासरी दर ४२०० रूपयांपर्यंत मिळत आहे. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार ०४ नोव्हेंबर रोजी बाजारसमितीत सोयाबीनला ४२०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. अमरावतीन बाजारसमितीत सोयाबीनला ३९८७ रुपये भाव मिळाला आहे. अमरावती बाजारसमितीत ९७८६ क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे. तुळजापूर बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी ४३०० रूपये भाव मिळाला आहे. जिंतूर बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी ४२०० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत ५७२ क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे. कमीतकमी दर ३९०० ते जास्तीतजास्त दर ४३०० रूपये भाव मिळाला आहे.

अमरावती- ३९८७ रूपये
जिंतूर- ३२०० रूपये
तुळजापूर- ४३०० रूपये