APMC म्हणजे नक्की काय ?
- By -
- Aug 24,2023
APMC म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची विक्री आणि व्यापाऱ्यांना मालाची खरेदी करता येण्याचे ठिकाण म्हणजे APMC.
कृषी उत्पन्न बाजार समितीची स्ठापना होण्यापूर्वी व्यापारी हे थेट शेतकऱ्यांकडून शेतीमालाची खरेदी करत होते. त्यामुळे मनमानी होऊन दर ठरवले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत होती. म्हणूनच शेतकऱ्यांच्या शेतमालाला संरक्षण मिळावे ह्या हेतूने कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. या बाजार समित्यांना व्यापारी, आडते, तोलाई ह्यांना परवाने देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.