सप्टेंबर महिन्यात या पिकांची करा लागवड
- By - Team Agricola
- Sep 10,2024
सप्टेंबर महिन्यात या' पिकांची करा लागवड
टोमॅटो
फुलकोबी
मिरची
गाजर
सप्टेंबर महिना जवळ आला आहे. सप्टेंबर महिन्यात भाजीपाला पिकांची शेती करून चांगला नफा मिळू शकतो. भाजीपाला पिके आणि बाग कामासाठी हा महिना सर्वात महत्त्वाचा आहे. शेतकरी या महिन्यात टोमॅटोची लागवड करू शकता. टोमॅटो लागवडीसाठी सप्टेंबर ते ऑक्टोंबर या कालावधीत पेरणी केली जाते. त्यानंतर फुलकोबी अशी भाजी आहे किती हिवाळा आले की प्रत्येक घरात खाल्ली जाते त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तुम्ही फुलकोबीची देखील लागवड करू शकता. त्यासोबत मिरची मिरचीची लागवड देखील सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात केली पाहिजे. या महिन्यात मिरचीची लागवड करून शेतकरी बांधव 140 ते 180 दिवसातून त्यातून चांगला नफा मिळवू शकता. त्यासोबत कोबीची शेती, गाजराची लागवड देखील तुम्ही सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला करू शकता.