अकलूज बाजार समिती लवकरच होणार डिजिटल
- By - Team Bantosh
- Aug 07,2024
अकलूज बाजार समिती लवकरच होणार डिजिटल
सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबासाठी प्रमुख बाजार समिती असलेल्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती लवकरच डिजिटल होणार आहे. शेतीमालाचे डिजिटल पद्धतीने वजनमाप सॉफ्टवेअर अर्थात बंतोष प्रणालीचा वापर या बाजारसमितीत केला जाणार आहे. बंतोष ॲपच्या माध्यमातून अकलूज बाजार समितीतील व्यवहार हे ऑनलाईन होणार आहेत.
अकलूज बाजार समितीच्या पदाधिकारी, संचालक मंडळाने बंतोष प्रणालीच्या माध्यमातून सुरु असलेले राज्यातील कामकाज पाहिले. त्यानंतर आपल्याही बाजार समितीमध्येही बंतोष प्रणालीद्वारे व्यवहार सुरु व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे लवकरच राज्यातील इतर बाजारसमित्याप्रमाणे अकलूज बाजारसमिती देखील डिजिटल बनणार आहे. आतापर्यंत राज्यातील अन्य बाजारसमिती जसे की मंचर, जुन्नर, शिरुर, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, पारनेर, मालेगांव,नामपूर,कोपरगाव,वैजापूर, लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती डिजिटल झाल्या आहेत. अगदी त्याचप्रमाणे अकलूज बाजारसमिती देखील लवकरात लवकर डिजिटल होणार आहे.
सभापती मा.श्री.मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, उपसभापती मा.श्री. बापूराव नारायण पांढरे, सर्व संचालक मंडळ आणि सचिव श्री.राजेंद्र तुकाराम काकडे, श्री.चंद्रकांत ज्ञानदेव अडगळे उपसचिव यांच्या पुढाकाराने अकलूज बाजार समिती ही आता डिजिटल होणार आहे. बंतोष प्रणालीचा आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी घरबसल्या फायदा हा घेतला आहे. त्यासोबत बाजारसमितींना देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा होत आहे. त्यासोबत दुसरीकडे शेतकरी, मापाडी, खरेदीदार, आडतदार ह्यांना बंतोष प्रणालीच्या माध्यमातून पावत्या बनवणे आणि त्यांचे रेकॉर्ड ऑनलाईन ठेवणे सोपे जाते. बंतोषच्या मोबाईल ॲपमधून बाजार समितीचे व्यवहार डिजिटल होत असल्याने बाजार समित्यांकडून ह्या प्रणालीचा स्विकार होत आहे. मोबाईल ॲपद्वारे होणाऱ्या पावत्या, थर्मल प्रिंटरद्वारे हातोहात मिळणारी पावती, तसेच घरबसल्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअप आणि मेसेजवर मिळणारे अपडेट्स ह्यामुळे बंतोष ॲप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.