कापसाच्या दरात काहीशी नरमाई
- By - Team Agricola
- May 01,2024
कापसाच्या दरात काहीशी नरमाई
कापसाच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. कापसाला सध्या सरासरी दर हा ६ हजार रुपये ८ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत आता कापसाला जो दर मिळतोय त्यात प्रती क्विंटल ८०० रुपयांनी घसरण झाली आहे. कापसाचे दर गेल्या काही महिन्यांपासून कमी झाले आहेत.देशातील कापसाच्या उत्पादनात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे भाव कमी झाले की ते आपल्याकडेही कमी होतात.
बाजारअभ्यासकांच्या मते सुरुवातीला कापसाला ८५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. तो आता घसरून ७ हजार रुपये प्रती क्विंटल झाला आहे. कापसाचे भाव आहे तसेच राहण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. दरात वाढ झाली तर जास्तीत जास्त दर हा १० टक्क्यांपर्यंत वाढु शकतात. कपुस दरवाढीच्या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी कापुस हा घरात साठवुन ठेवला होता पण आता मिळेल त्या दरात शेतकरी कापुस हा विकत आहे.