new-img

गव्हाला मिळतोय चांगला बाजारभाव

गव्हाला मिळतोय चांगला बाजारभाव

यंदा गेल्यावर्षीपेक्षा गहू उत्पादन घटले आहे. बाजारात गव्हाची आवक कमी झाली असल्याने गव्हाला समाधानकारक दर मिळत आहे त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. देशात गव्हाला सरासरी दर हा २ हजार ३०० ते ४ हजार ५०० रूपये मिळत आहे.

आज २५ एप्रिल रोजी पैठण कृषी उत्पन्न बाजारसमितीत सरासरी दर हा २ हजार ९५० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत बन्स गव्हाची आवक ही ४० क्विंटल झाली. उल्हासनगर येथे गव्हाला आज सरासरी दर हा ३२०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत गव्हाची आवक ही ७७० क्विंटल झाली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी भाव हा ३ हजार रुपये मिळाला असुन जास्तीत जास्त भाव हा ३ हजार ४०० रूपये मिळाला आहे.

सध्या गव्हाला समाधानकारक भाव हा मिळत आहे. बाजारअभ्यासकांच्यामते गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात.