new-img

बाजारसमितीत हरभऱ्याला मिळतोय चांगला दर

बाजारसमितीत हरभऱ्याला मिळतोय चांगला दर 

हरभऱ्याला सध्या चांगला दर मिळत आहे. बाजारातील हरभऱ्यााची मागणी वाढली असुन आवक ही कमी झाली आहे. त्यामुळे हरभरा दरात काहीशी सुधारणा आली आहे. हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ५०० ते ५ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार आज २४ एप्रिल रोजी हरभऱ्याला सरासरी दर हा दोंडाईचा-सिंदखेडा बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी दर हा ७ हजार ९११ रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत हरभऱ्याची आवक ही ११ क्विंटल झाली आहे. देऊळगाव राजा बाजारसमितीत हरभऱ्याला कमी दर मिळाला असुन सरासरी दर हा ५ हजार ३०० रूपये मिळाला आहे.

यंदा हरभऱ्याचे उत्पादन घटल्याने बाजारातील आवक ही कमी झाली आहे त्यामुळे हरभऱ्याला हमीभावापेक्षाही चांगला दर मिळत असल्याने उत्पादक शेतकरी समाधानी आहे. बाजार अभ्यासकांच्यामते हा दर आणखी काही दिवस असाच राहु शकतो.