बाजारसमितीत कांद्याला किती मिळतोय दर?
- By - Team Agricola
- Apr 19,2024
बाजारसमितीत कांद्याला किती मिळतोय दर?
बाजारसमितींमध्ये मागील काही दिवसांपासुन कांदा दरात घसरण सुरू आहे. कांदा दरात होणाऱ्या सतत घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
बाजारसमितींमध्ये कांद्याची आवक ही वाढलेली आहे. मुंबई कांदा-बटाटा मार्केट मध्ये आज दि १९ एप्रिल रोजी कांद्याला सरासरी दर हा १३०० रूपये मिळाला आहे. कांद्याची आवक ही ६०९१ क्विंटल झाली असुन या बाजारसमितीत कांद्याला कमीतकमी दर हा ११०० रूपये मिळाला आहे.
खेड-चाकण बाजारसमितीत कांद्याला सरासरी दर हा १३०० रूपये मिळाला आहे. कांद्याला सगळ्यात कमी दर अकलुज, मंगळवेढा बाजारसमितीत मिळाला आहे. कांद्याला कमीतकमी दर या बाजारसमितीत २०० रुपये मिळाला आहे. कांदा दरात होणाऱ्या सततच्या
घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे.