तुरीला मिळतोय १२ हजार रूपयांचा दर
- By - Team Agricola
- Apr 17,2024
तुरीला मिळतोय १२ हजार रूपयांचा दर
बाजारसमितींमध्ये तुरीच्या भावात मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे. काही बाजारसमितींमध्ये तुरीला सरासरी दर हा १२ हजारांच्या दरम्यान मिळत आहे. तुरीला समाधानकारक दर मिळाल्याने तुर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तुरीची आवक आणि दर हे देखील वाढत आहेत.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार तुरीला बाजारसमितीत १६ एप्रिल रोजी नागपुर बाजारसमितीत ११,१८८ रूपये दर मिळाला आहे. हिंगणघाट बाजारसमितीत तर तुरीला १२ हजारांपर्यंत दर मिळाला आहे. या बाजारसमितीत तुरीची आवक ही ३०४४ क्विंटल झाली आहे. बाजारसमितींमध्ये तुरीला समाधानकारक दर मिळत आहे. बाजार अभ्यासकांच्या मते तुरीचे दर पुढील काही दिवस तेजीत राहण्याची शक्यता आहे