तुर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, जाणुन घ्या आजचे दर
- By - Team Agricola
- Apr 16,2024
तुर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, जाणुन घ्या आजचे दर
यंदा सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. त्यातच आता तुर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. सध्या बाजारांत तुरीला चांगले दर मिळत आहे.
तुरीच्या दरात सुधारणा झाली आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज १६ एप्रिल रोजी उमरखेड बाजारसमितीत लाल तुरीला सरासरी दर हा ९३०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ९ हजार तर जास्तीत जास्त दर हा ९ हजार ५०० रूपये मिळत आहे. या बाजारसमितीत लाल तुरीची आवक ही ६० क्विंटल झाली आहे.
सध्या तुरीची आवक ही कमी झाली असुन तुरीला समाधानकराक दर मिळत आहे. त्यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.