तुरीला या बाजारसमितीत मिळतोय सर्वाधिक भाव
- By - Team Agricola
- Apr 15,2024
तुरीला या बाजारसमितीत मिळतोय सर्वाधिक भाव
बाजारसमितींमध्ये सध्या तुरीची आवक ही घटली आहे. त्यामुळे आता तुरीला चांगला दर मिळत असल्याने तुर उत्पादक शेतकरी समाधानी झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही बाजारसमितीत तुरीचे दर हे १० हजारांचा देखील टप्पा पार केला आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडाळाच्या अधिकृत माहितीनुसार १५ एप्रिल रोजी तुरीला सरासरी सर्वाधिक दर हा अमरावती, नागपुर बाजारसमितीत मिळाला आहे. अमरावती बाजारसमितीत सरासरी दर हा ११,३५० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ११,००० तर जास्तीत जास्त दर हा ११,७०० रूपये मिळाला आहे. नागपुर बाजारसमितीत देखील तुरीला चांगला दर मिळत आहे. सरासरी ११,१५२ रूपये दर मिळत आहे. या बाजारसमितीत ९८६ क्विंटल तुरीची आवक झाली आहे.
सध्या बाजारसमितीत तुरीची आवक घटली आहे. आवक घटल्यामुळे तुरीची मागणी वाढली आहे आणि त्यामुळे तुरीला दिलासादायक दर मिळत आहे. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.