आज उन्हाळ कांद्याला मिळतोय असा बाजारभाव
- By - Team Agricola
- Apr 15,2024
आज उन्हाळ कांद्याला मिळतोय असा बाजारभाव
मागील काही दिवसांपासुन कांदा दरात सतत घसरण सुरू आहे. कांंदा दराच्या घसरणीमुळे उत्पादक शेतकरी संकटात आला आहे.
कांद्याला सध्या सरासरी दर हा ९०० ते १४०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. लासलगाव-विंचुर बाजारसमितीमध्ये आज उन्हाळी कांद्याला दर हा १३५० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत कांद्याची आवक ही १४ हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या बाजारसमितीत कांद्याला सरासरी दर हा ७०० ते जास्तीत जास्त दर हा १४७६ रूपये दर मिळाला आहे.
वैजापुर बाजारसमितीत देखील कांद्याची आवक झाली आहे. या बाजारसमितीत कांद्याला दर हा १००० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत कांद्याला कमीतकमी दर हा ६०० तर जास्तीत जास्त दर हा १५०० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत कांद्याची आवक ३७३ क्विंटल झाली आहे.
बाजारसमितींमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कांदा दरात घसरण सुरू आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढीची आशा लागली आहे.