कापसाची आवक घटली, किती मिळतोय बाजारभाव
- By - Team Bantosh
- Apr 11,2024
कापसाची आवक घटली, किती मिळतोय बाजारभाव
सध्या बाजारसमितींमध्ये कापसाची आवक घटली आहे. कापसाला मागणी देखील वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कापसाच्या वायद्यांमधील चढ उतार देखील कायम आहेत.
कापसाला सध्या सरासरी दर हा ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापसाला अमरावती बाजारसमितीत बुधवारी सरासरी दर हा ७२५० रूपये मिळाला आहे. हिंगणघाट बाजारसमितीत कापसाची ३५०० क्विंटल आवक झाली असुन या बाजारसमितीत १० एप्रिल रोजी सरासरी दर हा ६५०० रूपये मिळाला.
अभ्यासकांच्यामते कापुस दरात चढ उतारही राहतील, अशा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.