हिरव्या मिरचीची आवक कमी, किती मिळतोय बाजारभाव?
- By - Team Agricola
- Apr 10,2024
हिरव्या मिरचीची आवक कमी, किती मिळतोय बाजारभाव?
हिरव्या मिरचीची आवक बाजारात कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात मिरचीला सध्या चांगला भाव मिळत आहे. बाजारसमितींमध्ये मिरचीला सरासरी ४ हजार ५०० ते ६ हजार रूपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचं पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज १० एप्रिल रोजी राहता बाजारसमितीत हिरव्या मिरचीला सरासरी ५२०० रूपये भाव मिळाला आहे. तर या बाजारसमितीत ४५०० ते ६००० रूपयांपर्यंत भाव मिळाला असुन हिरव्या मिरचीची आवक ही १० क्विंटल झाली आहे. आज श्रीरामपुर बाजारसमितीत मिरचीला सरासरी भाव हा ५००० रूपये मिळाला आहे. याबाजारसमितीत कमीतकमी दर हा ४५०० ते जास्तीत दर हा ५५०० रूपयांपर्यंत मिळाला आहे. बाजारसमितीत हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली आहे. सध्या मिरचीची आवक कमी झाली आहे. मिरचीला सध्या चांगला भाव मिळत आहे.
ऊन वाढत जात असल्याने त्याचा फटका हा मिरची उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे पुढील काळातही हिरव्या मिरचीची आवक कमी होत जाईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.