new-img

हळदीच्या आवकेत वाढ, दरही मिळतोय चांगला

हळदीच्या आवकेत वाढ, दरही मिळतोय चांगला

बाजारात शेतीमालाच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहे. एकीकडे कांदा, सोयाबीन दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. तर दुसरीकडे हळद उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहे. बाजारात नव्या हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होत असुन हळदीला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकरी समाधानी होत आहेत.


हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गंत संत नामदेव हळद मार्केटमध्ये यंदा सर्वाधिक प्रतिक्विंटल १६,०७४ रुपये दर मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हळदीची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि हळदीला दर ही चांगले मिळत आहे.


यंदा राजापुरी हळदीला तर आतापर्यंतचा सर्वाधिक दर हा २६ मार्च रोजी सांगली कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये ७०,००० रूपये  मिळाला आहे. हळदीला समाधानकारक दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. सध्या हळदीच्या चांगली तेजी असुन पुढील काळात भाव टिकून राहतील अस हळद बाजारातील अभ्यासक सांगत आहे.