कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण, बाजारसमितीत काय मिळतोय दर?
- By - Team Agricola
- Apr 08,2024
कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण, बाजारसमितीत काय मिळतोय दर?
कांदा दरात सतत घसरण सुरू आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. मार्चअखेरमुळे बहुतांश बाजारसमित्या गेल्या दहा दिवसांपासुन बंद आहे. ४ एप्रिल पासुन लेव्हीच्या मुद्यामुळे बाजारसमिती बंद आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज ८ एप्रिल रोजी कांद्याला पुणे-मोशी बाजारसमितीत सरासरी दर हा ८०० रूपये मिळाला आहे. तर या बाजारसमितीत कमीतकमी ४०० ते जास्तीत जास्त १२०० रूपये दर मिळाला असुन ८३१ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. पुणे- पिंपरी बााजारसमितीत लोकल कांद्याला आज सरासरी १२०० रूपये भाव मिळाला असुन कमीतकमी दर हा १००० जास्तीत जास्त दर हा १४०० रूपये मिळाला आहे.या बाजारसमितीत आज ९ क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली आहे.
कांदा दरात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे आणि काही बाजारसमिती १० दिवस बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.