new-img

तुरीला मिळतोय चांगला भाव

तुरीला मिळतोय चांगला भाव

यंदा तूरीचे भाव चांगलेच वाढलेत आहे. तुरीची आवक आता कमी होत असल्याने मागणी वाढत आहे.  सध्या तुरीला सर्व बाजारसमितीत सरासरी दर हा ८००० ते १०,००० रूपयांपर्यंत मिळत आहे.


महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज २ एप्रिल आज रोजी कृषी उत्पन्नबाजारसमिती उमरखेड-डांकी येथे लाल तुरीला सरासरी दर हा ९१०० रूपये मिळाला आहे. तर या बाजारसमितीत कमीत कमी दर हा ९००० ते जास्तीत दर हा ९२०० रूपये मिळाला असुन तुरीची आवक ही ८० क्विंटल झाली आहे. तर १ एप्रिल रोजी मुरूम बाजारसमितीत गज्जर तुरीला सर्वाधिक दर हा १०४२१ रूपये मिळाला. सध्या बाजारात तुरीची आवक कमी असल्याने तुरीला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांना कहीसा दिलासा मिळाला आहे.