new-img

पुणे बाजारसमितीत कांद्याला मिळाला कमी दर

पुणे बाजारसमितीत कांद्याला मिळाला कमी दर

कांदा दरात सतत घसरण होत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती येथे आज कांद्याला सरासरी दर १००० रूपये मिळाला. कांदा दरात होणाऱ्या या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.


१ एप्रिल आज महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लोकल कांद्यााला  कृषी उत्पन्न बाजारसमिती पुणे येथे सरासरी १००० रूपये दर मिळाला आहे. या बाजारसमितीत कांद्याला आज कमीतकमी ४०० ते जास्तीत जास्त १६०० रूपये दर मिळाला असुन कांद्याची आवक ही १५,१२६ क्विटल झाली आहे. कृषी उत्पन्न बाजारसमिती पुणे-पिंपरी येथे कांद्याला सरासरी १२५० रूपये भाव मिळाला. कमीत कमी भाव हा १००० तर जास्तीत भाव हा १५०० रूपये मिळाला असुन ५ क्विंटल कांद्याची आवक या बाजारसमितीत झाली आहे.  कांद्यावरची निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंतच लागू होती परंतु आता केंद्र सरकारनं  कांदा निर्यातबंदीला मुदतवाढ देत ती अनिश्चित काळासाठी लागू केलीय. गेल्या तीन महिन्यापासुन  निर्यातबंदी उठेल अशी शेतकऱ्यांना आशा लागली होती. सरकारने निर्यातबंदी अनिश्चित काळासाठी वाढवली. केंद्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे, आणि कांदा दरात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याच पाहायला मिळत आहे.