new-img

शरबती गव्हाला मिळाला सर्वाधिक दर

शरबती गव्हाला मिळाला सर्वाधिक दर

सध्या बाजारात गव्हाला व्हरायटीप्रमाणे दर मिळत आहे. गव्हाला बाजारसमितींमध्ये सरासरी दर हा २००० ते ४८०० रूपयांपर्यंत दर मिळत आहे. तर शरबती गव्हाला सर्वाधिक दर मिळत आहे. सध्या गहू काढणी सुरू आहे. त्यामुळे बाजारात नवा गहू विक्रिसाठी येत आहे. त्यामुळे बााजारात गव्हाची आवक वाढली आहे. 
३० मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजारसमिती पुणे येथे शरबती गव्हाची ४३० क्विंटल आवक झाली. तर या बाजारसमितीत गव्हाला ४८०० सरासरी दर मिळाला असून कमीत कमी दर हा ४२०० तर जास्तीत दर हा ५४०० रूपये मिळाला आहे. लोकल गव्हाला सध्या सरासरी २००० ते ३००० रूपयांपर्यंत सरासरी दर मिळत आहे. आज उमरेड बाजारसमितीत १०६६ क्विंटल गव्हाची आवक झाली. तर गव्हाला सरासरी दर हा २४५० रूपये मिळाला. आज शरबती गव्हाला सरासी दर हा ४८०० रूपये मिळाला आहे.