लसणाच्या दरात काहीशी घसरण
- By - Team Agricola
- Mar 30,2024
लसणाच्या दरात काहीशी घसरण
मागील काही दिवसांपासुन लसणाच्या दरात सतत चढउतार सुरु असल्याच पाहायला मिळत आहे. लसणाला बाजारसमितीत सरासरी दर हा ९००० ते १०००० रूपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. लसणाची आवक ही बाजारात वाढली आहे त्यामुळे सध्या लसणाचा दरात काहीशी घसरण होत आहे.
फेब्रुवारी महिन्याच लसणाच्या भावात चांगली तेजी आल्याच पाहायला मिळाल होत. परंतु मागील आठवड्यापासुन सध्या लसणाच्या भावात काहीशी नरमाई आली आहे. काही बाजारसमिती वगळता इतर बाजारसमितींमध्ये लसणाच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी नरमाई आली आहे. तर अभ्यासकांच्या मते या दरात अजुन काही दिवस चढउतार राहण्याची शक्यता आहे. लसणाची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे असही अभ्यासक म्हणत आहे.