new-img

ज्वारीची आवक वाढली

ज्वारीची आवक वाढली 


ज्वारीची बाजारातील आवक दिवसेंदिवस वाढत आहे. ज्वारीला सध्या सरासरी दर हा २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीचे उत्पादन वाढल्याने दरात आवक वाढली असुन दरात काहीशी नरमाई आली आहे.


महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार २८ मार्च आज कृषी उत्पन्न बाजारसमिती मुंबई येथे लोकल ज्वारीची १५२६ क्विंटल आवक झाली. ज्वारीला सरासरी दर हा ४२०० रूपये मिळाला असुन कमीत कमी दर २५०० मिळाला आहे. तर जास्तीत जास्त दर हा  ५६०० रूपये मिळाला आहे.