अमरावतीत तुरीला क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव
- By - Team Agricola
- Mar 27,2024
अमरावतीत तुरीला क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव
गेल्या अनेक दिवसांपासुन तुरीच्या दरात वाढ होत आहे. तुरीची आवक आता कमी होत असल्याने मागणी वाढत आहे. त्यामुळे तुरीला चांगला भाव मिळत असून तुर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
तुरीला सध्या चांगला दर मिळत आहे. तुरीच्या गुणवत्तेनुसार तुरीला भाव मिळत आहे. तुरीला २७ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजारसमिती अमरावती येथे सरासरी दर १००१५ रूपये मिळाला. तर कमीतकमी दर हा ९८०० ते जास्तीत दर १०२३१ रूपये मिळाला असुन बाजारसमितीत
लाल तुरीची आवक ही २३०१ क्विंटल झाली. कृषी उत्पन्न बाजारसमिती हिंगोली-खानेगाव नाका येथे आज लाल तुरीची ६८ क्विंटल आवक झाली. सरासरी दर ९९०० रूपये मिळाला. सध्या तुरीला सर्व बाजारसमितीत सरासरी दर हा ८००० ते १०००० रूपयांपर्यंत मिळत आहे. बाजारात तुरीची आवक कमी झाल्याने मागणी वाढतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांना कहीसा दिलासा मिळाला आहे.