पुणे बाजारसमितीत कांद्याला मिळतोय सरासरी ११०० रूपये दर
- By - Team Agricola
- Mar 27,2024
पुणे बाजारसमितीत कांद्याला मिळतोय सरासरी ११०० रूपये दर
मागील काही दिवसांपासुन बाजारसमितीत कांदा दरात सतत घसरण सुरू आहे. पुणे बाजारसमितीत आज लोकल कांद्याला सरासरी दर ११०० रूपये मिळत आहे. २७ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सकाळच्या सत्रात पुणे बाजारसमितीत १३,०१६ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. तर या कांद्याला सरासरी १,१०० रुपये भाव मिळाला. सर्वात कमी भाव हा ५०० रूपये मिळाला असुन जास्तीत दर हा १७०० रूपये मिळाला.
कांद्याच्या दरात दरात चढ-उतार होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. कांद्यावरची निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंतच लागू होती परंतु आता केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदीला मुदतवाढ देत ती अनिश्चित काळासाठी लागू केलीय. गेल्या तीन महिन्यापासुन निर्यातबंदी उठेल अशी शेतकऱ्यांना आशा लागली होती. सरकारने निर्यातबंदी अनिश्चित काळासाठी वाढवली. केंद्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे, आणि कांदा दरात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याच पाहायला मिळत आहे.