new-img

३१ मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम

३१ मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम

केंद्र सरकारने ३१ मार्च  नंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने २२ मार्च रोजी जारी केलेल्या ‘अद्यादेशानुसार’ नुसार, ३१ मार्च २०२४ नंतरही कांदा निर्यातबंदी कायम राहणार आहे. येत्या आठ दिवसात निर्यातबंदी संपणार अशी आशा शेतकऱ्यांना असतांना आता ही निर्यातबंदी कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी केली होती. परंतु आता ही निर्यातबंदी कायम ठेवण्याचा निर्णय सरकराने घेतला आहे. ३१ मार्चला ही कांदा निर्यातबंदी उठणार आणि उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु केंद्र सरकारने ही निर्यातबंदी कायम ठेवली आहे. परंतु ही निर्यातबंदी कधी पर्यंत असणार ते देखील स्पष्ट केले नाही. येत्या काही दिवसात कांद्यावरील निर्यातबंदी उठेल आणि कांद्याला भाव मिळेल या आशेवर असलेले  कांदा उत्पादक शेतकरी निराश झाले आहे. तर आता एकीकडे कांदा 
उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे.