श्रीराम मंदिराचे लोकार्पण - बाजार समित्या बंद!
- By -
- Jan 22,2024
अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारने अर्धा दिवस तर राज्य सरकारने पूर्ण दिवस शासकीय सुटी जाहीर केली. त्यामुळे सोमवारी (दि. 22) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये बंद राहिले आहेत. सोबतच राज्यातील बहुतांश बाजार समित्यादेखील बंद होत्या. यात नाशिक जिल्ह्यातील महत्वपूर्ण असलेल्या लासलगाव, येवला, पिंपळगाव बसवंत आदी कांदा बाजार समित्या देखील बंद होत्या. फक्त निफाड आणि विंचूर या दोन बाजार समित्यांमध्ये दुपारपर्यंत लिलाव सुरु होते. त्यानंतर या दोन्हीही बाजार समित्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच एमआयडीसीतील प्रमुख कंपन्या सुरु राहणार आहेत.