भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना १ रुपयांत पीक विमा दिला- माणिकराव कोकाटे
- By - Team Agricola
- Feb 15,2025
भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना १ रुपयांत पीक विमा दिला- माणिकराव कोकाटे
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना पीक विम्यासंदर्भात एक वक्तव्य केले आहे. हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.पीक विमा ही योजना यशस्वी व्हावी व त्याचा योग्य लाभ शेतकऱ्यांना मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. पीकविमा योजनेविषयी सरकारच्या गाठिशी चांगले – वाईट अनुभव आहेत. पण ही योजना सरकारला कोणत्याही स्थिती बंद करायची नाही, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी येथे केले. शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या त्यांच्या या विधानाने विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे