new-img

रासायनिक खतांच्या किमतीमध्ये ३५० रुपयांपर्यंत वाढ

रासायनिक खतांच्या किमतीमध्ये ३५० रुपयांपर्यंत वाढ

शेतकऱ्यांच्या शेतमाला बाजारभाव मिळत नसल्यानं त्याचा आर्थिक फटका बसत आहे असं असताना आता रासायनिक खतांच्या किमती वाढल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत. रासायनिक खतांच्या किंमती आधीच जास्त असताना खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये ५० रुपयांपासून ते ३०० ते ३५० रुपयांची वाढ होणार आहे. महागाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता नव्या वर्षात वाढणाऱ्या खतांच्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे. 
वाढीव दरानुसार,
डीएपी डाय अमोनिया फॉस्फेट खताची किंमत प्रती बॅग १ हजार ३५० रुपयांवरून १ हजार ५९० रुपये झाली आहे. 
१०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमती १४७० रुपयांवरून १७२५ रुपये होणार आहेत.तर सुपर फॉस्फेट ४७० वरून ५२० रुपयांपर्यंत दर वाढणार आहेत.