राज्याचा अंदाज ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरु होणार
- By -
- Oct 27,2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ऊस गाळप हंगामासाठी गठीत मंत्री समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आदी सदस्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. या बैठकीत राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
यंदा 14.07 लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून 88.58 लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी कमी झाले आहे. निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर कारखान्यांचे गाळप सुरू होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी एफआरपीबाबत समग्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.