सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्युज.
- By - Team Agricola
- Jan 16,2025
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्युज
https://youtube.com/shorts/O-OE0NTWZzY
सोयाबीनला भाव नाही म्हणून तुम्ही त्रस्त झाला आहेत का? तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगते. सोयाबीन खरेदीती मुदत १२ जानेवारी संपली होती पण अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीला अखेर यश आलं आहे. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली होती. त्यावर निर्णय घेण्यात आला असुन महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे्. या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री बाकी आहे. मुदवाढ दिल्यामुळं हमीभावात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री करता येणार आहे.