new-img

सिताफळाच्या 'या' जातींची लागवड देईल भरघोस उत्पादन

सिताफळाच्या 'या' जातींची लागवड देईल भरघोस उत्पादन

https://youtube.com/shorts/jDbgrW_lq7Y

जर आपण कोरडवाहू जमिनीतील लागवड योग्य फळबागाचा विचार केला तर सिताफळ लागवडीचा विचार तुम्ही नक्की करू शकता. राज्यातीस हवामान हे सिताफळ लागवडीसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही देखील विचार करू शकता. सिताफळाच्या दोन महत्त्वपूर्ण जाती आहेत नं १ अर्का सहन- या जातीचे सिताफळ गुणवत्तेच्या बाबतीत खूप सरस असून यामध्ये गोडपणा जास्त असतो. या जातीच्या एका सिताफळाचे वजन एक ते दीड किलोपर्यंत भरते. नं २ बाळानगर महाराष्ट्रामध्ये ही जात अतिशय प्रसिद्ध असून या जातीच्या एका फळाचे सरासरी वजन ३६० ग्रॅम असते व सरासरी ४० बिया असतात. या जातीच्या सीताफळाची वैशिष्ट्य म्हणजे बी कमी व गर जास्त असतो. या फळाच्या गरात साखरेचे प्रमाण साधारण असते व टिकाऊपणा जास्त असतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही या जातीच्या सिताफळाची लागवड करून चांगला नफा कमवू शकता.