new-img

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी , मुख्यमंत्र्यांची मागणी कृषीमंत्र्यांकडून मान्य सोयाबीन खरेदीला मुदतवाढ

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
मुख्यमंत्र्यांची मागणी कृषीमंत्र्यांकडून मान्य
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीला अखेर यश आलं आहे. सोयाबीन खरेदीची मुदत १२ जानेवारी रोजी संपली होती. याला पुन्हा एकदा केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत खरेदीस मुदतवाढ दिली आहे. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली होती.
महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदी ३१ जानेवारी पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री बाकी आहे. मुदवाढ दिल्यामुळं हमीभावात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री करता येणार आहे. जानेवारीपर्यंत वाढवण्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.