प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे फायदेच फायदे
- By - Team Agricola
- Jan 15,2025
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे फायदेच फायदे
https://youtube.com/shorts/TKnknNKFDhY
शेतकऱ्यांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे तुम्हाला एक नाही तर असे अनेक फायदे आहेत. सुरवातीला योजना काय ते समजून सांगते. या योजनेअंतर्गत सरकार कडून सिंचन सुविधांसह तुमचं उपकरणे खरेदीसाठी ही शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य वेळी पाणी देता येते. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची जमीन आणि जल स्त्रोत म्हणजेच विहीर किंवा बोअरवेल अशा सुविधा असतील तरच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून ७५ टक्के अनुदान तर २५ टक्के खर्च राज्य सरकार मार्फत करण्यात येत आहे. सिंचनाद्वारे शेतीला पाणी दिल्यामुळे पाणी वापरातही ४० ते ५० टक्के बचत होणार आहे, तसेच कृषी उत्पादन ४०% पर्यंत वाढण्याची शक्यता ही आहे. आहे ना माहितीचा व्हिडीओ तर चला पटापट इतरांनाही शेअर करा.