new-img

कांदा उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता

कांदा उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता

सध्या राज्यात कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत आहे. अशातच बांगलादेशनं भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्याचं टेन्शन वाढवलं आहे.

बांगलादेशातील वृत्तपत्र 'ढाका ट्रिब्यून'ने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी बांगलादेशात कांद्याच्या लागवडीत सुमारे 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही बातमी भारतातील शेतकऱ्यांसाठी चितेंची आहे. कारण बांगलादेश हा भारतीय कांद्याचा मोठा आयातदार आहे. आता तिथे कांद्याची लागवड वाढल्याने आयात कमी होईल, ज्यामुळे भारतात भाव आणखी घसरण्याचा शक्यता आहे.