new-img

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांना होणार फायदाच फायदा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांना होणार फायदाच फायदा

https://youtube.com/shorts/JuzRAvfH-mc

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार सतत नवनवीन योजना घेऊन येत असते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि योजना ही तुम्हाला माहितीय का याचे काय फायदे आहेत तर ते ही सांगते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना नवीन विहीर साठी २ लाख ५० हजार, जुनी विहीर दुरुस्ती ५० हजार,इंवेल बोरिंग २० हजार, वीज जोडणी १० हजार, शेततळ्यांचे प्लास्टिक १ लाख, सूक्ष्म सिंचन संच ५० हजार, तुषार सिंचन २५०००, पंपसंच २००००, नवीन विहीर पॅकेज ३ ते ३.५ लाख, जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज १ ते १.५ लाख,शेततळे अस्तरीकरण पॅकेज १.५५ ते १.८० लाख, सोलार पंप अनुदान ३०००० इतके अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. बाकी या योजनेचा तुम्ही फायदा घेण्याचा विचार करत आहात का कमेंट करून नक्की कळवा.