गृहिणी होणार पुणे जिल्यातील पहिले मधाचे गाव
- By -
- Oct 23,2023
पुणे जिल्ह्यातील पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून भोर तालुक्यातील गुहिणी या गावाची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या संकल्पनेनुसार राज्यात एकूण 10 मधाची गावे करण्याचा मानस आहे. पुणे जिल्ह्यातील पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून भोर तालुक्यातील गुहिणी या गावाची निवड होण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून येथील परिसराची पाहणी करुन भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. गुहिणी हे गाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तोरणा, राजगड, मढेघाट परिसराच्या कुशीत वसलेले असून भाटघर धरणाच्या पाठीमागील बाजूस निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक छोटेसे गाव आहे.