जानेवारी महिन्यात करा 'या' पिकांची लागवड.
- By - Team Agricola
- Jan 06,2025
जानेवारी महिन्यात करा 'या' पिकांची लागवड.
https://youtube.com/shorts/t3SKNvD5Pt0
शेतकरी बांधवांनो, जानेवारी महिन्यात या पिकांची लागवड करून तुम्ही कमवू शकता चांगला नफा, पण कसा तेही सांगते. जानेवारी महिन्यात घेतली जाणारी पिके कोणती ते पाहूयात. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या मते जानेवारी महिना हा टोमॅटो लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट महिना असतो. राज्यात मोठ्या प्रमाणात मिरची लागवड बघायला मिळते; साधारणता मिरचीची लागवड ही जानेवारी महिन्यात जास्त बघायला मिळते. असे असले तरी मिरचीसाठी लागणारी रोपे ही नोव्हेंबर महिन्यातच तयार करायला सुरुवात केली जाते. शेतकरी मिरची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात. मुळ्याची लागवड डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान केली जाते, पण जानेवारी महिन्यात चांगला नफा कमवू शकता. मुळ्याची विशेषता पुसा हिमानी या वाणांची लागवड या काळात अधिक बघायला मिळते. मुळ्याची ही जात ४० ते ७० दिवसांच्या आत काढणीसाठी तयार होते. या पिकातून चांगले दर्जेदार उत्पन्न प्राप्त करण्यासाठी वेळेवर पाणी देणे आवश्यक ठरते. पाणी व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन या दोन्ही गोष्टींची काळजी घेऊन या पिकातून चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. अशा पद्धतीने या तीन भाजीपाला पिकांची लागवड करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता.