new-img

कोंबड्यांचा ताण घालवण्यासाठी उपाय

कोंबड्यांचा ताण घालवण्यासाठी उपाय

https://youtube.com/shorts/9WtkbjZ4FFk

कोंबड्यांवरील ताण घालवण्यासाठी उपाय शोधताय तर हा कामाचा व्हिडीओ आताच सेव्ह करा. नं १ कोंबड्यांमधील ताण घालविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी प्रत्येक कोंबडीला किती जागा लागते हे पाहून आपल्याजवळील जागेच्या उपलब्ध जागेत एकूण कोंबड्यांची संख्या ठरवावी. नं २ छोट्या जागेत जास्त गर्दी केल्याने वातावरणात अमोनियाचे प्रमाण वाढते. शिवाय पक्षी एकमेकांच्या जास्त जवळ असल्याने रोग आल्यास लवकर पसरतो. यावर उपाय म्हणून लिटरची स्वच्छता ठेवावी. नं ३ पावसाळ्यात व जास्त आर्द्रतेच्या काळात लिटर प्रयत्नपूर्वक कोरडे ठेवावे. वातावरणातील बदलांनुसार शेडमध्ये पडदे लावणे, पोती बांधणे या गोष्टींची वेळेवर काळजी घ्यावी. नं ४ ताण घालविणारी औषधे तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने द्यावीत. आहारातून किंवा पाण्यातून जीवनसत्त्वांचा पुरवठा केल्यास ताण कमी होतो. ताण असताना लसीकरण करू नये. प्रथम कोंबड्यांवरील ताण कमी करून मगच लसीकरण करावे.