बाजार समित्यांना पणन मंडळाकडून मिळणारे कर्ज
- By -
- Oct 13,2023
बाजार समित्यांना त्यांच्या मुख्य व दुय्यम बाजार आवारांमध्ये विकासात्मक कामे हाती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडून अल्प व दीर्घ मुदतीची कर्जे दिली जातात. यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, लिलावगृह, ओटे, संरक्षक भिंत, भुईकाटे, इतर काटे, ग्रेडींग साहित्य, स्वच्छतागृहे, अंतर्गत रस्ते डांबरीकरण, इलेक्ट्रीफिकेशन, शेतकरी निवास, इतर सोयी, आडत गाळे व व्यापाऱ्यांसाठी कमर्शियल गाळे इ. चा समावेश होतो. सदरचे कर्ज कृषि पणन मंडळाच्या नियमानुसार मंजूर केले जाते.