new-img

नाशकात कोट्यवधींची कांद्याची उलाढाल

नाशिक जिल्ह्यातील सुमारे १५ बाजार समित्यांमधील कांदा लिलाव गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. लिलाव बंद झाल्याने कोट्यवधींचे नुकसान होत असून शेतकरीही अडचणीत आला आहे. दरम्यान लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर शुक्रवारी (दि. 22 सप्टेंबर) लासलगाव बाजार समिती प्रशासन कारवाईचा बडगा उगारला आहे.

कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी बुधवापासून (दि 20 सप्टेंबर) कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवला आहे. दोन दिवस उलटून गेले तरी बंदच्या भूमिकेवर कांदा व्यापारी असोसिएशन ठाम राहिले आहे. व्यापाऱ्यांच्या विरोधात आता लासलगाव बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.