new-img

पणन संचालनालय

शेतीमालाचे विपणनासंबंधीचे कामकाज काळानुसार वाढत गेले. हे कामकाज खरेदी-विक्री संघ ग्राहक संस्था, फळे व भाजीपाला संस्था, प्रक्रिया संस्था असे विविध प्रवर्गातील संस्थांची संख्याही वाढली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने इ.स. 1971 मध्ये स्वतंत्र पणन संचालनालयाची निर्मीती केली.

हे संचालनालय सहकार आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या नियंत्रणाखाली डिसेंबर 1979 पर्यंत कामकाज पाहत होते. 1 जानेवारी 1980 पासून पणन संचालकांना विभाग प्रमुखांचा दर्जा देण्यात येउन त्यांना स्वतंत्र प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान करण्यात आले.