new-img

लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती

1947 साली देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य चळवळीची जागा मग सहकार चळवळीने घेतली. त्या काळात लासलगांव परिसरातील शेतकरी, व्यापारी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांच्या प्रयत्नाने 1947 साली लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली.

सुरुवातीला निफाड व चांदवड तालुका या समितीचे कार्यक्षेत्र होते. पुढे चांदवड तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन झाल्यामुळे निफाड तालुका एवढेच कार्यक्षेत्र आपले राहिले. तदनंतर अगदी अलीकडे परत विभाजन होऊन लासलगांव आणि पिंपळगांव (ब) अशा दोन स्वतंत्र बाजार समित्या झाल्या. त्यामुळे सध्या लासलगांव-निफाड परिसर असे कार्यक्षेत्र आहे.