कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ
- By -
- Sep 11,2023
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 व त्याखालील नियम 1967 मधील तरतूदीनुसार बाजार समितीचा कारभार हा निवडून आलेले संचालक मंडळ, त्यांच्यामधील सभापती, उपसभापती, सदस्य व बाजार समितीचे सचिव अशा संचालक मंडळाकडून केला जातो.
बाजार समितीच्या सध्याच्या निवडणूक पद्धतीत कार्यक्षेत्रातील सेवा संस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्यांकडून 11 व ग्रामपंचायत सदस्यांकडून 4 असे 15 शेतकरी प्रतिनिधी निवडले जातात. शिवाय व्यापारी 2, हमाल व मापाडी 1 असे एकूण 18 प्रतिनिधी निवडून दिले जातात. सोसायटी मतदारसंघातील 11 जागांमध्ये सर्वसाधारण 7, महिला राखीव 2, इतर मागासवर्गीय 1 तर भटक्या जातीजमाती 1 अशी विभागणी असते.